‘तालिबानने अफगाणिस्तानावर ताबा मिळवून तेथील सत्ता हस्तगत केली. तेथे मुसलमानच मुसलमानांचे शिरकाण करतात. केवळ अफगाणिस्तानातच नव्हे, तर जगातील अनेक ठिकाणी अशी स्थिती आहे.
हिंदु धर्मात अनेक संप्रदाय, उपासना-पंथ आणि धार्मिक विचारधारा आहेत; पण ‘इतरांवर स्वतःच्या मताचे वर्चस्व प्रस्थापित होण्यासाठी कुणी कुणाविरुद्ध शस्त्र उगारत नाही आणि निष्पाप व्यक्तींचा रक्तपात करत नाही. याचे कारण म्हणजे, हिंदु धर्माची अनमोल शिकवण ! हिंदु धर्मात सांगितले आहे, ‘साधनानाम् अनेकता ।’ याचा भावार्थ म्हणजे, ‘साधनामार्ग जरी अनेक असले, तरी ते सर्व एकाच ईश्वरापर्यंत पोचतात.’ यासाठीच हिंदु धर्मियांमध्ये धार्मिक बाबतींत मतभिन्नता असली, तरी प्रत्येक जण दुसर्याच्या मताचा आदर करतो. आदि शंकराचार्यांनी वैदिक मताला गौण लेखणार्यांना वादविवादात जिंकले आणि वैदिक मताचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित केले; त्यासाठी त्यांनी रक्तपात केला नाही ! यावरून हिंदु धर्माचे श्रेष्ठत्वच लक्षात येते.’
– (पू.) संदीप आळशी (२५.८.२०२१)