|
काबुल (अफगाणिस्तान) – महिला आणि मुली घरी सुरक्षित राहू शकतात. त्यांनी बाहेर पडू नये; कारण तालिबान्यांना महिलांचा आदर करण्याचे प्रशिक्षण दिले गेलेले नाही.
महिलांना घरात रहाण्याचा देण्यात आलेला सल्ला तात्पुरता आहे. ‘असा आदेश आहे’, असे समजू नये. महिलांशी गैरवर्तन करू नये, यासाठी तालिबान्यांना प्रशिक्षण दिले जाईल, असे तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने पत्रकार परिषदेत सांगितले. (तालिबान्यांकडून यापूर्वी झालेले महिलांवरील अत्याचार पहाता एकातरी तालिबान्याला महिलांचा आदर, सन्मान करण्याचा संस्कार आहे का ? जर असा संस्कराच नसेल, तर ते अन्य तालिबान्यांना काय शिकवणार ? – संपादक) ‘महिलांविषयी पूर्वीपेक्षा अधिक उदारमतवादी वृत्ती स्वीकारतील. त्यांना काम करणे आणि शिक्षण देणे यांसाठी सूट दिली जाईल’, असे तालिबानने आधी सांगितले होते; मात्र काही दिवसांतच त्याची भूमिका पालटल्याचे दिसून आले.
The Taliban accepts women are not safe in their regime, tells Afghan women to stay at home as their soldiers are ‘not trained’ to respect themhttps://t.co/GDKlsFtyof
— OpIndia.com (@OpIndia_com) August 25, 2021
वर्ष १९९६ ते २००१ पर्यंत अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता होती. या काळात तालिबान्यांनी महिलांचे आयुष्य नरक बनवले होते. रस्त्याच्या मधोमध त्यांना चाबकाने मारहाण करण्यात येत होती, तसेच काही शिक्षांच्या अंतर्गत त्यांना दगडाने ठेचून ठार मारण्यात येत होते.