कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मराठी मावळ्यांची परंपरा म्हणजेच शिवकालीन युद्धकला भारतातील मराठी बांधव, युवा पिढीला माहिती व्हावी, त्यांनी ती अवगत करावी या उद्देशाने शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच आणि हिल रायडर्स अॅडव्हेंचर फाऊंडेशनचे सदस्य सुरज ढोली कार्यरत आहेत. त्यासाठी आग्रा ते राजगड गरुड झेप मोहीम चालू करण्यात आली आहे. मोहिमेच्या प्रारंभी आग्रा येथील लाल किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दांडपट्टा, तलवारबाजी, भाला आदी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
या मोहिमेत सुरज ढोली यांच्या समवेत सर्वश्री गणेश जाधव, अंकेश ढोरे, विनायक धारवटकर, चैतन्य बोडके सहभागी झाले आहेत. या वेळी आग्रा येथील आमदार योगेंद्र उपाध्याय, महापौर, स्थानिक मराठी बांधव, गरुडझेप मोहीमप्रमुख मारुति आंबा गोळे, शामराव ढोरे, नितीन चव्हाण, राजाभाऊ कुलकर्णी, विशाल शिंदे, अतुल ढोरे यांसह शिवभक्त उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दांडपट्टा, तलवारबाजी, भाला आदी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके पहाण्यासाठी येथे क्लिक करा :
https://www.facebook.com/280685029136281/videos/1155717308171417/