२२ ऑगस्ट २०२१ या दिवशी ‘संस्कृतदिन’ आहे. त्या निमित्ताने…
१. भारत सरकार – ‘सत्यमेव जयते ।’ म्हणजे ‘नेहमी सत्याचाच विजय होतो.’
२. लोकसभा – ‘धर्मचक्र प्रवर्तनाय ।’ म्हणजे ‘धर्मचक्राला पुढे नेण्यासाठी.’
३. उच्चतम (सर्वाेच्च) न्यायालय – ‘यतो धर्मस्ततो जयः ।’ म्हणजे ‘जिथे धर्म (न्याय) आहे, तिथे विजय निश्चित आहे.’
४. ऑल इंडिया रेडिओ – ‘बहुजनहिताय बहुजनसुखाय ।’ म्हणजे ‘अनेकांच्या हितासाठी, अनेकांच्या सुखासाठी.’
५. दूरदर्शन – ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ म्हणजे ‘जे सत्य आहे तेच कल्याणकारी आणि सुंदर आहे.’
६. गोवा राज्य – ‘सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् ।’ म्हणजे ‘सर्वांचे कल्याण होवो, कुणी दुःखी असू नये.’
७. भारतीय जीवनविमा निगम – ‘योगक्षेमं वहाम्यहम् ।’ म्हणजे ‘मी चरितार्थ चालवतो.’
८. डाक तार विभाग – ‘अहर्निशं सेवामहे ।’ म्हणजे ‘आम्ही रात्रंदिवस सेवा करतो.’
९. श्रम मंत्रालय – ‘श्रमेव जयते ।’ म्हणजे ‘श्रमाचाच विजय होतो.’
१०. भारतीय सांख्यिकी संस्थान – ‘भिन्नेष्वेकस्य दर्शनम् ।’ म्हणजे ‘भिन्नतेत एकतेचे दर्शन.’
(संदर्भ : सामाजिक माध्यम)