२५ ऑगस्टपासून कास पुष्प पठार पर्यटकांसाठी होणार खुले ! – वनसमितीच्या बैठकीतील निर्णय

कास पुष्प पठार

सातारा, १९ ऑगस्ट (वार्ता.) – जागतिक वारसा स्थळ असणार्‍या कास पुष्प पठारावरील नैसर्गीक रंगीत रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांना खुले करण्यात येणार आहे. कोरोनाचे नियम पाळत ऑनलाईन बुकींग करून पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे, असा निर्णय १८ ऑगस्ट या दिवशी झालेल्या वनसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.

कोरोनामुळे गतवर्षी कास पुष्प पठार पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते; मात्र जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने वनवसमितीने ही बैठक घेतली. २५ ऑगस्टपासून कास पुष्प पठार पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. यासाठी मानसी १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे, तसेच वाहनतळ, बस प्रवास आणि मार्गदर्शक (गाईड) यांसह अन्य शुल्कही द्यावे लागणार आहे.