कार्यालयातील सुरक्षारक्षकाला भुताकडून मारहाण !

आर्मेनिया (कोलंबिया) शहराच्या महापौरांचा दावा

  • कोलंबियामध्ये अंनिससारख्या संघटना असत्या, तर तेथेही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करून महापौरांना कारागृहात टाकण्याची मागणी करण्यात आली असती ! – संपादक 
  • ‘भूते अस्तित्वात नाहीत’, असे भारतातील कथित बुद्धीप्रामाण्यावाद्यांनी ठरवूनच टाकल्याने ते याविषयी संशोधन करण्यासही सिद्ध नाहीत; मात्र संशोधक वृत्तीचे पाश्चात्त्य याविषयी सतत शोध घेण्याच्या भूमिकेत रहातात ! – संपादक 
जोस मॅन्युअल रिओय मोरालेस

बोगोटा (कोलंबिया) – कोलंबियातील आर्मेनिया शहराचे महापौर जोस मॅन्युअल रिओय मोरालेस यांनी एक सीसीटीव्ही चित्रीकरणाचा व्हिडिओ फेसबूकवर प्रसारित केला आहे. महापौर जोस मॅन्युअल रिओय मोरालेस यांनी ‘रात्रीच्या वेळी एका भुताने माझ्या कार्यालयावर आक्रमण केले. त्याने सुरक्षारक्षकाला मारहाण केली’, असा दावा केला आहे. ‘या असामान्य शक्तीला रोखण्यासाठी स्थानिक बिशप आणि इतर धार्मिक नेते यांना कार्यालयात पाचारण करणार आहे’, असेही महापौरांनी म्हटले आहे. (भूतबाधा दूर करण्याविषयी हिंदु धर्मामध्ये जितके उपाय आहेत, तेवढे अन्य कुणाकडेही नाहीत ! – संपादक)

१. महापौरांच्या या व्हिडिओमध्ये अदृश्य शक्ती सुरक्षारक्षकाला भिंतीवर आपटतांना दिसत आहे. सुरक्षारक्षकाला मागून कुणीही पकडलेले नाही. तरीही तो भिंतीवर आदळून नंतर भूमीवर पडल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

२. या व्हिडिओची अनेकांनी थट्टा उडवली, तर काहींनी ‘ही घटना सत्य असू शकते’, असे म्हणत समर्थनही दिले.