पाक शरणार्थी संशयित व्यक्ती असल्याची पोलिसांची माहिती !
पोलिसांनी याविषयीचे सत्य हिंदूंसमोर आणणे आवश्यक ! – संपादक
जालौर (राजस्थान) – येथील धानता भागामध्ये पाकमधून आलेल्या हिंदु शरणार्थीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यामध्ये त्रिलोकचंद राणा नावाची पाकिस्तानी हिंदु व्यक्ती तिच्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या करणार असल्याचे सांगत आहे. राणा यांनी त्यांच्या कुटुंबियांचा छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे.
त्रिलोकचंद राणा यांनी म्हटले की, त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना भारतात बोलावले होते आणि तेच आता त्यांचा छळ करत आहेत. तसेच गावातील लोकही त्रास देत आहेत. हे लोक त्यांना गावातून निघून जाण्यासाठी बाध्य करत असून मारहाणही करत आहेत. ‘मला पुन्हा पाकमध्ये पाठवा किंवा मला साहाय्य करा अन्यथा मी आत्महत्या करीन’, असे राणा व्हिडिओमध्ये सांगतांना दिसत आहे.
राजस्थान के जालौर का है मामला #Rajasthan @AnilonTwiitter
https://t.co/nJPdQY3xjY— AajTak (@aajtak) August 5, 2021
गुप्तचर विभागाच्या प्राथमिक चौकशीत त्रिलोकचंद राणा संशयास्पद व्यक्ती असल्याची माहिती
त्रिलोकचंद राणा यांचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी या घटनेची चौकशी चालू केल्यावर लक्षात आले की, राणा गेल्या ४ वर्षांपासून येथे अवैधरित्या रहात आहे. त्यांच्यावर संशयास्पद कृती केल्याचाही आरोप आहे. त्यांचा गावात रहाणार्या लोकांशी अनेकदा वाद झाल्याचीही माहिती मिळाली आहे. यावरून त्यांची पोलिसांनी चौकशीही केली होती. राणा रहात असल्याच्या भागामध्ये पाकमधून आलेल्यांना रहाण्याची अनुमती नाही. (असा नियम असतांना गेल्या ४ वर्षांपासून राणा येथे कसे रहात आहेत ? गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस या कालावधीत काय करत होते आणि आताही ते यावर काय करणार आहेत, हे त्यांनी सांगायला हवे ! – संपादक)