१. विविध त्रास होणे
‘मी सद्गुरु राजेंद्र दादांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंसूचना वाचण्यास आरंभ केल्यावर ४ ते ५ दिवसांत मला पुढीलप्रमाणे विविध त्रास झाले.
१ अ. शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होणे : मी पहिल्या दिवशी कागदावरील स्वयंसूचना वाचत असतांना मला काहीही जाणवले नाही. मला त्या १० मिनिटे सहजतेने वाचता आल्या; परंतु दुसर्या दिवसापासून स्वयंसूचना वाचतांना मला त्रास होऊ लागला. त्या वेळी मला स्वयंसूचना सहजतेने वाचता न येणे, त्यांचे आकलन न होणे, त्या वाचतांना अनावर झोप येणे, डोके जड होणे, असे विविध त्रास होऊ लागले.
१ आ. मनात नकारात्मक विचार येणे : ‘मला या स्वयंसूचनांचा काहीच लाभ करून घेता येत नाही’, असे नकारात्मक विचार माझ्या मनात येऊ लागले.
१ इ. ‘स्वयंसूचना वाचू नयेत’, असे वाटणे : त्यानंतर मला त्या १० मिनिटांच्या स्वयंसूचना वाचण्यासाठी अर्धा घंटा लागला आणि ‘या स्वयंसूचना वाचू नयेत’, असे वाटू लागले.
२. नामजप करून आणि देवाला प्रार्थना करून सूचना वाचण्यास आरंभ केल्यावर लाभ होऊ लागणे :
त्यानंतर मी सूचना वाचण्यापूर्वी नामजप करून आणि देवाला प्रार्थना करून मगच सूचना वाचण्यास आरंभ करू लागले. त्यामुळे मला सूचना वाचता येऊ लागल्या आणि त्यांचा मला लाभही होऊ लागला.
३. सूचना वाचल्यावर झालेले लाभ
अ. ‘मला या सूचनांचा लाभ होत आहे’, हे माझ्या लक्षात येऊ लागले.
आ. सूचना दिल्यामुळे माझे मन सकारात्मक राहू लागले.
इ. पूर्वी मला कुठलीही सेवा करतांना ताण येत असे. तो अल्प झाला, तसेच ‘मी चांगली सेवा करू शकते’, असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला.
ई. मी या सूचना दिवसभरात दोन वेळा वाचल्याने माझे मन सतत देवाच्या अनुसंधानात राहू लागले.
उ. माझ्या मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाण न्यून होऊन मन आनंदी झाले.
ऊ. मला त्रास होत असल्याची जाणीव होऊ लागली. त्या वेळी स्वयंसूचना वाचल्यावर मला पुष्कळ चैतन्य मिळू लागले.
ए. ‘स्वयंसूचनांचे आकलन होऊन मला त्यांचा लाभ होत आहे’, असे मला जाणवू लागले.
सद्गुरु राजेंद्रदादा ‘मी स्वयंसूचना वाचते कि नाही ?’, याचा प्रतिदिन आढावा घेत होते. त्यामुळे ‘प्रतिदिन दोन वेळा सूचना वाचण्यासाठी तेच शक्ती पुरवत आहेत’, असे मला वाटत होते.’
– कु. मेधा सहस्रबुद्धे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.७.२०१८)