सातारा जिल्ह्यातील ३७९ गावे अतीवृष्टीमुळे प्रभावित !

१ सहस्र ३२४ कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

सततच्या अतीवृष्टीमुळे जिल्ह्यातील ३७९ गावे प्रभावित

सातारा, २५ जुलै (वार्ता.) – सततच्या अतीवृष्टीमुळे जिल्ह्यातील ३७९ गावे प्रभावित झाली असून आतापर्यंत १ सहस्र ३२४ कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

शेखर सिंह पुढे म्हणाले, ‘‘आतापर्यंत विविध घटनांमध्ये १८ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण हरवले आहेत. अतीवृष्टीमुळे ३ सहस्रांहून अधिक पशूधनही मृत्युमुखी पडले आहे. जिल्हा प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या ३ तुकड्या कार्यरत असून चौथ्या तुकडीची मागणी केली आहे.