मुंबईतील पालट धोकादायक; भविष्यातील मोठ्या संकटाचे हे संकेत नाहीत ना ? – आमदार आशिष शेलार, भाजप

आशिष शेलार

मुंबई – मुंबईत पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओसरलेले नाही. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले. २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना असा अनुभव आला नव्हता. भविष्यात मुंबईवर बेतणाऱ्या मोठ्या संकटाचे हे संकेत नाहीत ना ? अशी भीती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ‘ट्वीट’द्वारे व्यक्त केली.


एका ‘ट्वीट’मध्ये त्यांनी म्हटले की, मुंबईत या वेळी दिसणारे पालट धोकादायक वाटत आहेत. नंतर हळहळ व्यक्त करण्यात काय अर्थ ? मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींची तातडीने बैठक घ्यावी. तज्ञांना बोलवावे आणि आवश्यक असतील ते निर्णय घ्यावेत.