जम्मू-काश्मीरमध्ये बकरी ईदनिमित्त गाय, वासरू आणि उंट यांची कुर्बानी देण्यावर बंदी

असा आदेश केंद्रशासनाने संपूर्ण देशासाठी दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

प्रातिनिधिक छायाचित्र

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राज्याच्या पशू आणि मत्स्य पालन विभागाने बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात गाय, वासरू आणि उंट यांची कुर्बानी देण्यावर बंदी घातली आहे. याविषयीचा आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, आयुक्त, पोलीस आदींना पाठवण्यात आला आहे. बकरी ईदच्या वेळी जनावरांची मोठ्या संख्येने अवैधरित्या कुर्बानी दिली जाते.