कोरोनावरील लस देण्यासाठी धर्माच्या आधारे भेदभाव करणे, हे राज्यघटनेच्या तत्त्वांचे उल्लंघन ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

शरणार्थी हिंदूंना धर्मनिरपेक्षता मान्य नाही. ते हिंदु धर्माचे पालन करतात आणि त्यानुसार आचरण करतात या कारणांमुळे हिंदुद्वेषी राजस्थान सरकारने शरणार्थी हिंदूंकडे दुर्लक्ष केले, हे भयानक वास्तव आहे. हिंदु शरणार्थींना लस देणे, केंद्र सरकारने वेळोवेळी घोषित केलेले अन्न-धान्य पुरवठा करणे, भोजन देणे यांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले गेले. प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार असतांना सरकारने कोरोनावरील लस देण्यासाठी धर्माच्या आधारे भेदभाव करणे, हे राज्यघटनेच्या तत्त्वांचे उल्लंघन आहे.