असे करण्यापेक्षा एकेका विभागात लस दिली, तर एका घरातील सर्वांचे लसीकरण एकाच वेळी होईल. प्रत्येकाला वयानुसार जावे लागणार नाही !

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ लसीची पहिली आणि दुसरी मात्रा (डोस) देण्याचे नियोजन नुकतेच करण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण ७ सहस्र ६८० लसी उपलब्ध असतील. या वेळी कोणत्याही परिस्थितीत ४५ वर्षांखालील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही.’