‘गुजरात सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत केलेला लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीही संमत केला आहे. हा कायदा राज्यात १५ जून २०२१ पासून लागू झाला आहे. या कायद्यामुळे बलपूर्वक, आमीष दाखवून किंवा विवाहाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडले, तर गुन्हा असणार आहे. या कायद्यांतर्गत दोषी आढळल्यास आरोपीला १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.’