रोग अनेक – औषध एक !

त्रिफळा

त्रिफळा

गळू, नाडीव्रण, गंडमाळा, भगंदर, सूज, गुल्म आणि मूळव्याध – त्रिफळा गुग्गुळ

पोट फुगणे, अजीर्ण, पोटात दुखणे, खोकला, दमा : अग्नीमुख चूर्ण ! – कुष्ठ ८ भाग, चित्रक ७, हिरडा ६, ओवा ५, कापूरकाचरी ४, पिंपळी ३, वेखंड २, हिंग १ भाग चूर्ण डोस ४ ग्रॅम

कफ, संधीवात, आमवात, सायटिका, डोकेदुखी, सूज, ताप, त्वचारोग – बचनाग पाण्यात उगाळून त्याचा लेप द्यावा.

गुळवेल

गुळवेल

वातरक्त, संधिवात किंवा आमवात – गुळवेलीचा रस, सुंठीचा काढा, मनुकांचा काढा किंवा जेष्ठमधाच्या काढ्यासह घ्यावा.

मूर्च्छा, सायटिका, भ्रम, क्षय, ताप, कृशता, अतिसार, खोकला, रक्तपित्त आणि हृदयाची दुबर्लता – खजूर किंवा खारीक

अतिसार (जुलाब), पोटदुखी, खोकला – पुदिन्याचा रस आणि आल्याचा रस प्रत्येकी १ चमचा सैंधव घालून प्यावा.

आंबेहळद

आंबेहळद

कफ, व्रण (जखम), खोकला, दमा, उचकी, ताप, शूल (पोटदुखी) कंड, खरूज, मुखरोग आणि रक्तदोष यांवर उपयोगी – आंबेहळद !

कान दुखत असल्यास, पक्षाघात, कंपवात, सायटिका : कुष्ठादी तेल – कुष्ठ, हिंग, वेखंड, देवदारू, बडीशेप, सुंठ, सैंधव समभाग चूर्णाचा १ भाग, तेल ४ भाग आणि शेळीचे मूत्र १६ भाग आटवून यथाविधी तेल सिद्ध करावे.

कोहळा (कूष्मांड)

कोहळा (कूष्मांड)

मानसरोग, मनोदौर्बल्य, स्मरणशक्ती कमी होणे, लघवी कमी होणे, लघवीची आग होणे, अपस्मार, कावीळ, आम्लपित्त, उन्माद – कोहळा (कूष्मांड) !

पित्तज्वर, विषमज्वर, आम्लपित्त, कण्ड आणि त्वचाविकार – भूनिबादिक्वाथ काढा ! – काडेचिराईत, कुटकी, अडुळसा, कडू पडवळ, कडुनिंब, चंदन आणि त्रिफळा यांचा काढा करावा. ३० ते ६० मिलिलिटर दोनदा घ्यावा.