नागपूर येथे महिला रुग्णाचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘एलेक्सिस’ रुग्णालयातील कर्मचार्‍यास अटक !

नागपूर – मानकापूर येथील ‘एलेक्सिस’ रुग्णालयातील ‘सीटी स्कॅन’ विभागातील ‘हाऊस किपिंग’चा कर्मचारी महेश घोडमारे (वय ३९ वर्षे) याने रुग्णालयात आलेल्या ३९ वर्षीय महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. महिलेला भोवळ येण्यासह इतरही त्रास होता. त्यावरील उपचारासाठी १९ जून या दिवशी सायंकाळी ५ वाजता त्या रुग्णालयात आल्या होत्या. त्या वेळी ही घटना घडली.