कोरोनाच्या साथीमध्ये उपयोगी ठरू शकणारी आयुर्वेदातील औषधे

कोरोनारूपी आपत्काळासाठी मार्गदर्शक सदर !

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट गंभीर स्वरूपाची होती. आता तिसरी लाट येऊ शकते, असे प्रसारमाध्यमांमधून समजत आहे. कोरोनाच्या संसर्गामध्ये शासनाने प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय चिकित्सेसह आयुर्वेदाचे उपचारही घेतल्याने उपचार परिणामकारक होतात, हे अनेकांनी अनुभवले आहे. प्रस्तुत लेखात कोरोनामध्ये उपयुक्त ठरू शकणार्‍या आयुर्वेदाच्या औषधांची माहिती प्राधान्यक्रमानुसार देण्यात आली आहे.

लेखाविषयी स्पष्टीकरण

१. हे सर्व लेखन लोककल्याणाच्या हेतूने करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, वैद्य आदी उपलब्ध नसतांना लोकांचे प्राण वाचवता यावेत, हा यामागील उद्देश आहे. लोकांना डॉक्टर किंवा वैद्य यांच्याकडे न जाता स्वतःच्या मनाने औषधे घेण्यास प्रेरित करण्यासाठी हे लेखन केलेले नाही.

२. येथे औषधांचे जे मूल्य दिले आहे, त्याच्या पाठीमागे वाचकाला त्याचे आर्थिक नियोजन करणे सोपे व्हावे, एवढाच उद्देश आहे. यामागे कोणत्याही आस्थापनाचे (कंपनीचे) विज्ञापन करण्याचा किंवा कोणत्याही दृष्टीने आर्थिक लाभ मिळवण्याचा उद्देश नाही.

– (पू.) वैद्य विनय नीळकंठ भावे, मोर्डे, ता. संगमेश्‍वर, रत्नागिरी. (४.५.२०२१)

पू. वैद्य विनय नीळकंठ भावे यांचा परिचय

पू. वैद्य विनय भावे

पू. वैद्य विनय नीळकंठ भावे हे ‘वरसईकर वैद्य भावे’ म्हणून महाराष्ट्र आणि गोवा येथील वैद्यांमध्ये सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या मालकीच्या ‘श्री अनंतानंद औषधालय’ या आयुर्वेदाच्या औषधनिर्मिती आस्थापनाच्या माध्यमातून उत्कृष्ट औषधे बनवून अनेक वर्षे आयुर्वेदाची सेवा केली. पू. वैद्य विनय भावे हे सनातनचे संत आहेत.

येथे दिलेल्या औषधांसह शासनाने प्राधिकृत केलेली वैद्यकीय चिकित्सा आणि औषधे घेणे टाळू नये. अन्य सर्व उपाययोजना पाळाव्यात, तसेच स्थळ, काळ आणि प्रकृती यांनुसार चिकित्सेत पालट होऊ शकतो. त्यामुळे योग्य त्या वैद्यांचा सल्लाही घ्यावा.

पुढील सारण्यांमध्ये ज्या औषधांच्या नावांपुढे ‘*’ अशी खूण आहे, त्या औषधांची सनातनच्या वतीने निर्मिती सध्या चालू असून पुढील काही मासांत ही औषधे उपलब्ध होणार आहेत.

१. कोरोनामध्ये उपयुक्त ठरू शकणारी प्राधान्याची औषधे

२. साहाय्यक औषधे

टीप – कोरोनामध्ये आपोआप उलटी किंवा जुलाब झाल्यास ताप उतरतो, असे बर्‍याच वैद्यांचे निरीक्षण आहे. तापाचे कारण असलेले वात, पित्त आणि कफ हे दोष उलटी किंवा जुलाब यांवाटे शरिरातून बाहेर पडून गेल्याने ताप उतरतो. त्यामुळे कोरोनामध्ये ताप उतरत नसेल, रुग्णाला शक्ती असेल आणि शक्य असेल, तर केवळ २ – ३ वेळा पातळ शौचाला होईल, एवढ्याच प्रमाणात एरंडेल तेल किंवा गंधर्व हरीतकी यांसारखे औषध घ्यावे, असे काही वैद्य सांगतात. १ – २ चमचे एरंडेल तेल वाटीभर गरम पाण्यासह किंवा २ – ३ गंधर्व हरीतकी वटी (गोळ्या) / १ चमचा गंधर्व हरीतकी चूर्ण घेतल्याने कोठा साफ होतो. पोट साफ होण्यासाठीच्या औषधाची मात्रा स्वतःच्या पूर्वानुभवावरून ठरवावी. यानंतर जयमंगल रस हे औषध घेतल्यास चांगला परिणाम दिसून येतो, असा अनुभव आहे.

३. पेठेत उपलब्ध औषधांचे सध्याचे सर्वसाधारण दर

वरील औषधांचे पेठेतील सध्याचे दर दिले आहेत. हे दर केवळ मूल्याचे अनुमान यावे (खर्चाचा अंदाज यावा), यासाठी दिले आहेत. आस्थापनानुसार (कंपनीनुसार) दरांमध्ये पालट असू शकतो.

३ अ. प्राधान्याची औषधे (अ)

३ आ. साहाय्यक औषधे (आ)

४. औषधांच्या वापराविषयी अधिक माहिती

अ. वरील सर्व औषधे ३ ते ७ वयोगटातील मुलांना पाव प्रमाणात, तर ८ ते १४ या वयोगटातील मुलांना अर्ध्या प्रमाणात द्यावीत.

आ. मधातून घ्यायच्या गोळ्यांचे बोटांच्या साहाय्याने चूर्ण करून ते चूर्ण मधात नीट मिसळावे. शक्यतो सर्व औषधे चघळून खावीत. यामुळे त्यांची परिणामकारकता वाढते.

इ. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी औषध मधासह न घेता पाण्यातून घ्यावे किंवा नुसतेच चघळून खावे.

ई. येथे दिलेली औषधे अ‍ॅलोपॅथी किंवा होमिओपॅथी औषधे चालू असतांना घेण्यास आडकाठी नाही. केवळ अन्य पॅथीतील औषधे आणि आयुर्वेदाची औषधे यांमध्ये न्यूनतम १५ मिनिटांचे अंतर ठेवावे. औषधे शक्य असल्यास रिकाम्या पोटी घ्यावीत; पण तसे शक्य नसल्यास खाऊन घेतली, तरी चालतील.

उ. एखाद्या वैद्याकडे कोरोना संदर्भातील आयुर्वेदाचे उपचार चालू असतील किंवा आपण नियमित एखाद्या वैद्यांचे औषध घेत असाल, तर येथे दिलेली औषधे घेण्यापूर्वी त्यांना विचारावे.

ऊ. औषधे अधिक काळासाठी घ्यायची झाल्यास, तसेच या लेखाच्या संदर्भात काही शंका असल्यास आयुर्वेदाचे उपचार करणार्‍या स्थानिक वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे.

५. औषधांविषयी अन्य माहिती

अ. येथे दिलेल्या औषधांपैकी जी चूर्णे आहेत, त्यांचा टिकण्याचा कालावधी उत्पादन दिनांकापासून २ वर्षे असतो. अन्य सर्व गोळ्या ५ वर्षांहून अधिक काळ टिकणार्‍या आहेत. औषध टिकण्यासाठी डबीचे झाकण घट्ट लावावे आणि डबी कोरड्या जागेत ठेवावी.

आ. ही औषधे केवळ कोरोनामध्ये निर्माण होणार्‍या लक्षणांमध्येच नव्हेत, तर इतर वेळीही अशी लक्षणे निर्माण झाल्यास वापरता येतात.

इ. येथे दिलेली औषधे अत्यंत सुरक्षित आणि दुष्परिणाम विरहित आहेत. आजकाल काही लोक ‘धातूंची भस्मे असलेल्या आयुर्वेदाच्या औषधांमुळे मूत्रपिंड किंवा यकृत खराब होते’, असा अपप्रचार करतात. यामुळे बरेच आधुनिक वैद्य त्यांच्या रुग्णांना ‘आयुर्वेदाची औषधे घेऊ नका’, असे सांगतात. ‘शास्त्रीय पद्धतीने केलेल्या कोणत्याही धातूंच्या भस्मांमुळे मूत्रपिंड किंवा यकृत खराब होते, असे म्हणणे’, हा निवळ अपप्रचार आहे. याला शास्त्रीय आधार नाही.

ई. येथे दिलेली सर्व औषधे पेठेत (बाजारात) बैद्यनाथ या आस्थापनाची मिळतात. कोणत्याही आस्थापनाची औषधे घेण्यास आडकाठी नाही.

६. पेठेतून औषधे विकत घेण्यासाठी मार्गदर्शक सूत्रे

अ. जे आर्थिक दृष्टीने सक्षम आहेत, ते त्यांच्या आवश्यकतेनुसार औषधे घेऊन ठेवू शकतात.

आ. ज्यांना आर्थिक दृष्टीने अडचण आहे, त्यांनी औषधे घेतांना पुढील सूत्रांचा विचार करून स्वतः किती औषधे विकत घ्यावीत, हे तारतम्याने ठरवावे.

१. वर औषधांचे जे प्रमाण दिले आहे, ते एका व्यक्तीसाठी लागणारे सर्वसाधारण प्रमाण आहे.

२. यातील ‘प्राधान्याची औषधे’ विकत घेण्यास प्राधान्य देता येईल.

३. जी प्राधान्याची ६ औषधे दिली आहेत, तीही प्राधान्यक्रमानुसार दिली आहेत, म्हणजे पहिल्या क्रमांकाचे जे औषध आहे, ते सर्वांत जास्त प्राधान्याचे आणि जीवनरक्षक (लाईफ सेव्हिंग) म्हणून वापरता येण्यासारखे आहे.

४. आयत्या वेळी धावपळ होऊ नये, यासाठी शक्य असल्यास एका घरामध्ये न्यूनतम (किमान) प्राधान्याच्या औषधांची प्रत्येकी एक डबी असावी.

– (पू.) वैद्य विनय नीळकंठ भावे, मोर्डे, ता. संगमेश्‍वर, रत्नागिरी. (४.५.२०२१)

‘कोरोनाच्या साथीमध्ये उपयोगी ठरू शकणारी आयुर्वेदातील औषधे’ हा लेख साधक आणि वाचक यांनी संग्रही ठेवावा.