अनैतिक कृत्य केल्याप्रकरणी वैज्ञानिक यादव याच्यावर बडतर्फीची कारवाई केली पाहिजे !

नागपूर – येथील एका केंद्रीय संशोधन संस्थेत कार्यरत असणार्या २८ वर्षीय तरुणीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी दिनेशकुमार यादव (वय ३० वर्षे, रा. भोपाळ) या वैज्ञानिकाविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे. ही तरुणी मूळची बारामती येथील रहिवासी असून ती केंद्रीय संशोधन संस्थेत प्रयोगशाळा साहाय्यक तंत्रज्ञ आहे. काही दिवसांपूर्वी यादव प्रशिक्षणासाठी येथे आला होता. ५ जून या दिवशी दिनेश याचा वाढदिवस असल्याने त्याने तरुणी आणि अन्य सहकारी यांना एका उपाहारगृहात मेजवानी दिली होती. मेजवानी आटोपून तरुणीच्या दुचाकीवरून परततांना त्याने हे कृत्य केले. दिनेशकुमार याला न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन संमत केला आहे.
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
उरुळी कांचन (पुणे) येथे मुसलमान दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक