सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ सहस्र २०० रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव !

आतापर्यंत २८ लाख रुपयांची दंडवसुली

आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच परिणाम !

मुंबई – मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर आता १ सहस्र रुपये २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव लवकरच प्रशासन संमतीसाठी महासभेत पाठवणार आहे. पालिकेने गेल्या सहा मासांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या १४ सहस्र जणांवर कारवाई करून २८ लाख रुपयांची दंडवसुली केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने विविध आजार पसरू शकतात, हे लक्षात घेऊन पालिकेकडून त्यावर कारवाई केली जाते. कोरोनाचा संसर्ग चालू झाल्यानंतर पालिकेने ही कारवाई अधिकच तीव्र केली आहे. तरीही थुंकणार्‍यांचे प्रमाण न्यून होत नसल्याने पालिकेने दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पालिकेकडून त्यासाठी २०० रुपये दंड आकारला जात आहे. दंडाची रक्कम १ सहस्र २०० रुपये करण्यासाठी पालिका सभागृहाची संमती घेऊन हा प्रस्ताव राज्य सरकारच्या संमतीसाठी पाठवण्यात येणार आहे.