लॉर्ड माऊंटबॅटन यांची दैनंदिनी सार्वजनिक करण्यास ब्रिटन सरकारचा नकार ! 

लंडन – ब्रिटिश सरकारने पुन्हा एकदा भारतातील ब्रिटिशांचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांची दैनंदिनी आणि पत्रे सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. लेखक अँड्यू लोवनी यांनी गेली ४ वर्षे ती सार्वजनिक करण्यासाठी प्रयत्न केले होते; मात्र त्यांना अपयश आले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, दैनंदिनी आणि पत्रे यांद्वारे अनेक गोपनीय माहिती उघड होऊ शकते. यामुळेच कदाचित सरकार ती उघड करण्यास नकार देत आहे.