पणजी – गोव्यात १७ मे या दिवशी ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. यांपैकी गोमेकॉमध्ये २३, तर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात २७ रुग्णांचा मृत्यू झाला आणि उर्वरित मृत्यू अन्य आरोग्य केंद्रात झाले. यामुळे कोरोनामृतांची संख्या २ सहस्र १५२ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ४ सहस्र २६५ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १ सहस्र ५६२ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३६.७० टक्के झाले आहे. दिवसभरात ४ सहस्र ८ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १९३ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या २ सहस्र ४९९ ने घटून २५ सहस्र ७५३ झाली आहे.