पिंपरी येथे अवैधपणे रेमडेसिविर बाळगणार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आरोपींवर तात्काळ आणि कठोरात कठोर कारवाई केली, तरच अशा घटनांना आळा बसेल !

पिंपरी – अवैधपणे २१ रेमडेसिविर इंजेक्शन बाळगणार्‍या ३ जणांना वाकड पोलिसांनी कह्यात घेतले आहे. कृष्णा पाटील, निखील नेहरकर आणि शशिकांत पांचाळ अशी आरोपींची नावे असून हे तिघेही वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित आहेत. ९ मे या दिवशी पहाटे २.३० च्या सुमारास काळेवाडी फाट्यावर नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता आरोपींकडे रेमडेसिविर इंजेक्शन आढळून आले. या प्रकरणी अन्न आणि औषध विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर वाकड पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.