श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या विनामूल्य भोजन व्यवस्थेसाठी देश आणि परदेशातून साहाय्य

भोजनाच्या डब्यांसह नितीन चौगुले आणि अन्य कार्यकर्ते

सांगली – श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात भरती असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाइकांना विनामूल्य भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. सध्या ४०० पेक्षा अधिक डबे प्रतिदिन पोच करण्यात येत आहेत. याच समवेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही, अशा गरजू कोरोना रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवले जात आहेत. याची नोंद घेत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानला दुबई, कॅनडा, सिंगापूर, मस्कत, कतार यांसह औदुंबर येथील श्री दत्त सेवाभावी मंडळ, सांगली येथील श्री ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ, रॉयल बोट क्लब, ‘देसाई चॅरिटेबल ट्रस्ट’, यांसह समाजातील दानशूर व्यक्तींचे साहाय्य लाभत आहे.