उत्तरप्रदेशातील ५ शहरांत दळणवळण बंदी घालण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशातील ५ शहरांत दळणवळण बंदी लावण्याच्या दिलेल्या निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. लक्ष्मणपुरी, वाराणसी, कानपूर, प्रयागराज आणि गोरखपूर या शहरांत २६ एप्रिल २०२१ पर्यंत दळणवळण बंदी लावण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने १९ एप्रिल या दिवशी राज्य सरकारला दिल्यानंतर सरकारने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने आदेशात असेही म्हटले की, आमच्याकडे अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी उच्च न्यायालयानेच करावी.

उत्तरप्रदेश सरकारने दळणवळण बंदीला विरोध करतांना न्यायालयात म्हटले की, बंदीमुळे लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर परिणाम होईल. जनतेच्या जीवनाचे आणि उपजीविकेचे संरक्षण करणे, हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या आदेशांवर कार्यवाही होऊ शकत नाही. कोरोनाच्या भीतीने अनेक ठिकाणी लोक आपणहूनच बंद पाळत आहेत.