उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली इंदूर (तेलंगाणा) येथील कु. झांसी राघवपुरम् (वय १० वर्षे) !

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली इंदूर (तेलंगाणा) येथील कु. झांसी राघवपुरम् (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. झांसी राघवपुरम् एक आहे !

इंदूर (तेलंगाणा) येथील बालसाधिका कु. झांसी राघवपुरम् हिची आई सौ. गायत्री राघवपुरम् यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथेे दिली आहेत. (वर्ष २०१८ मध्ये कु. झांसी राघवपुरम् हिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती.)

कु. झांसी राघवपुरम्

१. प्रेमभाव

‘आमचे कुटुंबीय, नातेवाईक किंवा मित्रपरिवार यांच्यापैकी कुणाचा वाढदिवस असेल, तर झांसी त्याची सिद्धता साधारण एक मास (महिना) आधीच करते. तिच्याजवळ असलेल्या पैशांतून ती त्यांच्यासाठी भेटवस्तू खरेदी करून त्यांना देते. तिच्या वडिलांचा पाय दुखत असल्यास ती त्यांना मर्दन करून देते.

२. प्रामाणिकपणा

कु. झांसी स्वतःची चूक प्रामाणिकपणे स्वतःच सांगते. तिच्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न झाले नसतील, तर ती ते व्यष्टी आढाव्यात मोकळेपणाने सांगते.

३. सकारात्मक रहाणे

जर एखाद्या दिवशी तिची व्यष्टी साधना अल्प झाली, तर ती सकारात्मक राहून दुसर्‍या दिवशी प्रयत्न करते. मी जर तिला रागावले, तर तेही ती सकारात्मकतेने घेण्याचा प्रयत्न करते.

४. घरकामात साहाय्य करणे

ती मला घराची स्वच्छता करणे, भाजी चिरणे, देवघरात दिवा लावणे इत्यादी कामात साहाय्य करते.

५. सात्त्विकतेची आवड

झांसीला सात्त्विक भोजन अधिक आवडते. तेलंगाणामध्ये तिखट पदार्थ अधिक प्रमाणात खातात; परंतु तिला सात्त्विक पदार्थ, उदा. तूप आणि दही खाणे आवडते.

६. व्यवस्थितपणा

ती तिच्या व्यष्टी साधनेशी संबंधित सर्व साहित्य व्यवस्थित ठेवते. ती घरात भाजी चिरायला घेतांना चांगली भाजी निवडून घेते.

७. दिसेल ते कर्तव्य

घरात कोणी भ्रमणभाष भारित (चार्जिंग) करण्यास ठेवला असेल आणि तो भारित झाल्यावर काढला नसेल, तर ती स्वतः चार्जिंगचे बटण बंद करते. घरात पायपुसणे तिरके झाले असेल, तर ती ते स्वतः नीट करून ठेवते.

८. व्यष्टी साधनेविषयी गांभीर्य असणे

ती प्रतिदिन नामजप पूर्ण करते. एखाद्या दिवशी तिचा नामजप पूर्ण झाला नाही, तर ती नामजप पूर्ण करूनच भोजन करते. ती प्रतिदिन तिचा व्यष्टी साधनेचा आढावा वेळेवर देण्याचा प्रयत्न करते. तिने प्रायश्‍चित घेतले असेल, तर ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.

९. अनावश्यक व्यय न करणे

आम्ही बाहेर बाजारात गेल्यावर अनावश्यक खरेदी होणार नाही, याविषयी ती दक्ष असते. ‘घरासाठी जेवढेे आवश्यक आहे, तेवढेच खरेदी करूया’, असे ती सांगते.

१०. स्वभावदोष

वक्तशीरपणाचा अभाव, इतरांचे न ऐकणे, मनानुसार करणे आणि प्रतिमा जपणे, हे तिचे प्रमुख स्वभावदोष आणि अहंचे पैलू लक्षात आले आहेत.’

– सौ. गायत्री राघवपुरम् (झांसीची आई), इंदूर (निजामाबाद), तेलंगाणा. (ऑक्टोबर २०२०)