सिंधुदुर्गात कोरोनाचा वाढता संसर्ग

नवीन ३१८ रुग्ण सापडले : ६१ जणांची प्रकृती चिंताजनक 

१. मृत्यू झालेले एकूण रुग्ण १९८

२. उपचार चालू असलेले रुग्ण १ सहस्र ५६६

३. बरे झालेले एकूण रुग्ण ६ सहस्र ९०६

४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ८ सहस्र ६७६

५. चिंताजनक प्रकृती असलेले रुग्ण ६१

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा कोरोना लसीकरण चालू

सावंतवाडी – सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण चालू झाले आहे. लसीच्या तुटवड्यामुळे आठवडाभर लसीकरण बंद होते. जिल्हा आरोग्य विभागाकडून ५०० डोस प्राप्त झाल्यानंतर लसीकरण पुन्हा चालू करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील पत्रकारांना या वेळी लसीकरण करण्यात आले. कोरोना लसीकरणाला १६ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आला होता.