देशात आणीबाणी आणि युद्ध यांसारखी स्थिती निर्माण होऊ शकते !

हिंदूंच्या नववर्षाचा ‘राजा’ मंगळ ग्रह असल्यामुळे होणारा परिणाम !

( प्रतिकात्मक चित्र )

नवी देहली – येत्या १३ एप्रिल या दिवशी हिंदु नववर्ष म्हणजे गुढी पाडवा आहे. या नववर्षाचा राजा मंगळ ग्रह असणार आहे. याच दिवशी सूर्य ग्रह मेष राशीत प्रवेश करणार असल्याने ‘मेष संक्रांती’ होणार आहे. यामुळे यावर्षाचा ‘मंत्री’ अथवा ‘सेनापती’ मंगळ ग्रह अणार आहे. अनेक दशकांनंतर मंगळ हा वर्षाचा ‘राजा’ आणि ‘मंत्री’ असल्याची स्थिती निर्माण होत आहे. जेव्हा वर्षाचा राजा आणि मंत्री मंगळ सारखा ग्रह असतो त्या वेळी हिंदु ज्योतिषशास्त्रानुसार युद्ध आणि आणीबाणी यांची स्थिती निर्माण होते. ही स्थिती पुढील वर्षभरात निर्माण होऊ शकते, असे वृत्त ज्योतिषांच्या हवाल्याने नवभारत टाइम्स या दैनिकाच्या वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे.

१. मंगळाच्या या स्थितीमुळे पुढील वर्षभरात देशाचा राजा म्हणजे सरकार जनतेच्या हितासाठी कठोर निर्णय घेऊ शकते. महागाई, अग्नीकांड, अनैसर्गिक पाऊस, वीज पडण्याच्या घटना अधिक होतील. यामुळे पिकांची हानी होऊ शकते. या वर्षात लोकांना पित्ताचा त्रात होऊ शकतो.

२. हिंदु नववर्षाच्या कुंडलीमध्ये लग्न स्थानामध्ये मंगळ सप्तम आणि द्वादश स्थानाचा अधिपती आहे. लग्नेश शुक्र हा मंगळसमवेत असल्याने परिवर्तन योग बनवत आहे. यामुळे भारतात विदेशी गुंतवणूक वाढणार आहे, तसेच चीन आणि पाक यांच्याशी तणाव निर्माण होऊ शकतो.

३. सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून काही ऐतिहासिक निर्णय घेतले जाण्याचे संकेत मिळत आहेत. सरकारकडून काही राज्यांमध्ये विशेष व्यवस्था आणली जाऊ शकते.