साडेचार फुटांपेक्षा उंच सुनामीच्या लाटा !
मनिला (फिलिपीन्स) – ८ जूनच्या सकाळी फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. स्थानिक प्रमाणवेळेनुसार भूकंप सकाळी ७.३७ वाजता झाला. यात अनेक इमारतींची हानी झाली. देशभरात विविध ठिकाणच्या काही इमारती कोसळल्याचेही वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपामुळे आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक जण घायाळ झाले.
🚨 Philippines Hit by Powerful 7.8 Magnitude Earthquake 🚨
A massive 7.8-magnitude earthquake struck off the coast of Mindanao, Philippines, claiming at least 19 lives and triggering tsunami waves up to 1.4 meters (4.5 ft).
🔹 Epicenter located about 32 km southwest of Massim,… pic.twitter.com/NS2xUHpIm0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 8, 2026
भूकंपाचा केंद्रबिंदू !
भूकंपाचा केंद्रबिंदू मिंडानाओ बेटाजवळील समुद्रात होता. सारांगनी प्रांतातील ‘मासीम’ शहरापासून नैऋत्येला साधारण ३२ किलोमीटर अंतरावर आणि ३३ किलोमीटर खोलीवर भूकंप झाला.
सुनामीची तीव्रता !
भूकंपानंतर सुनामी आली. सर्वांत उंच लाट १.४ मीटर (साधारण साडेचार फूट) इतकी होती. शेजारील देश इंडोनेशिया आणि मलेशिया, तसेच अगदी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनीही सुनामीचा इशारा दिला होता, मात्र त्यांनी तो कालांतराने मागे घेतला.
भूकंपाशी संबंधित ३ महत्त्वपूर्ण घडामोडी !
१. ७ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जनरल सँटोस या बंदराच्या शहराची सर्वाधिक हानी झाली. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकार्यांच्या माहितीनुसार या शहरात किमान ७ जणांचा मृत्यू झाला, तर १३० जण घायाळ झाले.
२. उन्हाळी सुटीनंतर सोमवारी देशभरातील शाळा पुन्हा चालू झालेल्या असतांना ध्वजारोहण समारंभाच्या वेळी ही आपत्ती कोसळली. या वेळी अनेक मुले भीतीमुळे बेशुद्ध पडली.
३. ‘पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सेंटर’ने अनुमान वर्तवला होता की, फिलिपीन्सच्या काही किनारी भागांत ३ मीटर उंचीपर्यंतच्या लाटा उसळू शकतात. इंडोनेशिया आणि मलेशियाच्या काही भागांसाठीही एक मीटरपर्यंत उंचीच्या लाटांचा इशारा देण्यात आला होता.


Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका