
राजापूर – तालुक्यातील पन्हाळे तर्फे सौंदळ परिसरात इतिहास अभ्यासक विनोद पवार यांना अश्मयुगीन कालखंडाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण मानवाकृती कातळशिल्प आढळून आले आहे. या शोधामुळे तालुक्यातील प्रागैतिहासिक वारशात आणखी एका महत्त्वपूर्ण स्थळाची भर पडली आहे. पन्हाळे माळवाडी परिसरातील जांभ्या दगडाच्या सड्यावर हे कातळशिल्प आढळून आले.
कोकणात आढळलेली कातळशिल्पे ही प्रागैतिहासिक मानवाच्या जीवनशैली, श्रद्धा, निसर्गाशी असलेले नाते आणि ज्ञानपरंपरेची प्रचीती देणारी मानली जातात. पन्हाळे तर्फे सौंदळ येथील ही मानवाकृती देखील अशाच प्राचीन वारशाचा भाग असण्याची शक्यता असून या स्थळाचा पुरातत्त्वीय आणि शास्त्रीय अभ्यास होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
माळवाडी परिसरातील हे कातळशिल्प अनुमाने ४ फूट उंच आणि ३ फूट रुंद असून ही मानवाकृती दोन्ही हात बाजूला पसरलेल्या अवस्थेत कोरलेली आहे. दूरून पाहिल्यास एखाद्या व्यक्तीची सावलीच कातळावर उमटली असल्याचा भास या आकृतीमुळे होतो. या कातळशिल्पाचा शोध लागल्यानंतर परिसराची पहाणी, स्वच्छता आणि प्राथमिक दस्तऐवजीकरणाचे काम करण्यात आले. या संशोधन मोहिमेत पराग पारकर, वरद पवार, वरुण जाधव, यश इंगळे आणि समर्थ आबवले यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !