संपत्ती हडपण्यासाठी हिंदु तरुणाचे धर्मांतर करून त्याच्याशी केला विवाह
शामली (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यात आयुष मलिक नावाच्या २७ वर्षीय औषधांच्या दुकानाच्या मालकाचे फसवणूक करून, तसेच त्याचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी महिला व्यायाम प्रशिक्षक चांदणी कुरेशी आणि तिचे वडील इस्लाम कुरेशी यांना अटक केली. आयुष मलिक हा त्याच्या वडिलांचा एकुलता मुलगा असून ते कोट्यधीश आहे. त्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवून चांदणी कुरेशी हिने आयुष याला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे सांगितले जात आहे.
🚨 Uttar Pradesh: Shamli "Love Jihad" Case Takes a New Turn 🚨
Gym trainer Chandni Qureshi and her father Islam Qureshi have been arrested in the alleged conversion case involving Ayush Malik, the only son of a wealthy Hindu family.
According to the complaint, Ayush was… pic.twitter.com/ahXfguWIq1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 8, 2026
१. पीडित तरुण आयुष मलिक हा अनुमाने ५ वर्षांपूर्वी ‘कुरेशी प्लस’ नावाच्या स्थानिक जिममध्ये जात होता. तिथे २५ वर्षीय चांदणी कुरेशी ही प्रशिक्षक म्हणून कार्यरत होती.
२. चांदणीने एका नियोजित कटांतर्गत आयुषला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, असा आरोप आयुषचे वडील देवराज मलिक यांनी केला आहे. तसेच लग्न करण्यासाठी तिने आयुषवर इस्लाम धर्म स्वीकारण्याचा तीव्र दबाव आणला.
३. दोघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे देहली गुपचूप ‘निकाह’ (इस्लामी पद्धतीने विवाह) केला. त्यानंतर आयुषचे नाव पालटून महंमद अली ठेवण्यात आले.
४. आयुषच्या पालटलेल्या रहाणीमानामुळे कुटुंबाला संशय आला. शामलीचे पोलीस अधीक्षक नरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, आयुषला पाकिस्तानी धर्मोपदेशक डॉ. इस्रार अहमद यांच्या चिथावणीखोर भाषणांचे यू ट्यूब व्हिडिओ दाखवून प्रभावित करण्यात आल्याचे समोर आले आहे.
५. पोलिसांनी या प्रकरणात ३ मौलवींसह एकूण ९ ते १० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि ‘उत्तरप्रदेश बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायद्या’च्या अंतर्गत खंडणी गोळा करणे (कलम ३०८) फसवणूक (कलम ३१८) बनावट कागदपत्रे बनवणे (कलम ३३६, ३३८) गुन्हेगारी धमकी देणे (कलम ३५१) आदी कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
६. या प्रकरणामागे मोठी यंत्रणा कार्यरत आहे का ?, हे शोधण्यासाठी पोलिसांनी एक विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे.
७. स्थानिक हिंदु संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आंदोलनाची चेतावणी दिली आहे. सध्या पोलिसांच्या भीतीमुळे किंवा दबावामुळे आयुष मलिक अज्ञात ठिकाणी निघून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था