राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त विंग (ता. खंडाळा) येथे विराट हिंदु संमेलन उत्साहात साजरे !

विंग (ता. खंडाळा) – आजच्या काळात लव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. हिंदु धर्मावर वेगवेगळ्या जिहादच्या माध्यमातून होणारे आघात आणि घटना देशभरात अजूनही होत आहेत. धर्माचे रक्षण करायचे असेल, तर हिंदूंनो धर्माभिमान जागृत करा आणि धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ३१ मे २०२६ या दिवशी खंडाळा तालुक्यातील विंग येथे ‘ग्रामस्थ तरुण मंडळ’ आणि ‘हिंदु संमेलन समिती’ यांच्या वतीने विराट हिंदु संमेलनाचे आयोजन करण्यात आले. प.पू. शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी हिंदूंनी जातिभेद विसरून संघटित होण्याचा संदेश दिला, तर सामाजिक कार्यकर्ते श्री. अमित कुलकर्णी यांनी संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रकर्तव्याच्या जाणीवेवर मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. सूत्रसंचालन श्री. जितेंद्र मगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. योगेश महांगरे यांनी केले. या संमेलनाला २५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
सांगली, मिरज, कुपवाड शहरातील विद्युत् वाहिन्या भूमीगत करण्यासाठी २५० कोटी रुपयांची मागणी ! – सौ. नीता केळकर, संचालिका, महावितरण
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
भाववाढ झाली असली, तरी ठेकेदारांनी कामे पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार !
‘वन्दे मातरम्’च्या इतिहासावर सहयोगी संपादक सिद्धराम पाटील यांचे १४ जूनला व्याख्यान !
#Boycott_Amazon : हिंदु जनजागृती समितीकडून ‘ॲमेझॉन इंडिया’ला कायदेशीर नोटीस !