भटकळ (कर्नाटक) येथील मंदिराच्या तोडफोडीचे प्रकरण
हिंदूंमधील ३० हून अधिक समाजांचे नेते सहभागी

(मूरीनकट्टे म्हणजे देवाची शिदोरी ठेवण्यासाठीचे लहान मंदिर)
भटकळ (कर्नाटक) – हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या येथील ‘मूरीनकट्टे’ची मुसलमानांच्या जमावाने २४ मेच्या रात्री तोडफोड केली होती. याचा निषेध करण्यासाठी, तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करत हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला आणि आंदोलनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. आंदोलनात तालुक्यातील कानाकोपर्यांतून हिंदु संघटनांचे कार्यकर्ते, तसेच हिंदूंमधील ३० हून अधिक समाजांचे नेते सहभागी झाले होते. येथील श्री चन्नपट्टण हनुमान मंदिराच्या परिसरापासून तालुका प्रशासकीय भवनापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.
तालुका प्रशासकीय भवनात जमलेल्या सहस्रो लोकांना संबोधित करतांना ‘हिंदु जागरण वेदिके’चे दक्षिण प्रांत प्रमुख पुंडलिक दळवाई म्हणाले, ‘‘आमच्या मूरीनकट्टेची ३ सहस्र लोकांनी येऊन तोडफोड करणे असाह्य आहे. आमच्या धार्मिक श्रद्धेचे केंद्र असलेला हा कट्टा बांधणे आमच्यासाठी अजिबात कठीण नाही. राज्याबाहेरून विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे कार्यकर्ते आणून तो बांधण्याची शक्ती आमच्यात आहे; परंतु भटकळमधील हिंदु संघटनांनी ‘आम्ही स्वतः तो बांधू’, असे सांगितल्यामुळे आम्ही शांत बसलो आहोत.
हिंदु जागरण वेदिकेचे प्रमुख श्रीकांत शेट्टी कार्कळ म्हणाले की, मूरीनकट्टेच्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी सध्या केवळ संघटना पुढे आल्या आहेत. आमचा समाज रस्त्यावर उतरला, तर पोलिसांना बळाचा वापर करणे शक्य होणार नाही. आमच्या आंदोलनासाठी सहस्रो पोलीस तैनात करणारे सरकार धर्मांधांवर काय कारवाई केली ?, हे का स्पष्टकरत नाही ?, असा प्रश्न विचारत त्यांनी मुसलमान संघटनांच्या प्रमुखांवरही कारवाई करण्याची मागणी केली.
श्रीकांत शेट्टी कार्कळ पुढे म्हणाले की, आमच्या समाजाच्या धार्मिक श्रद्धास्थानाची तोडफोड करणार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, तसेच त्यांना चिथावणी देणार्यांवरही कायद्यानुसार योग्य कारवाई झाली पाहिजे. भटकळ दंगलीचे अन्वेषणकरणार्या न्यायमूर्ती जगन्नाथ शेट्टी आयोगाच्या अहवालात ‘भटकळमध्ये पाकिस्तानच्या आय.एस्.आय.च्या (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) संपर्कात असलेले लोक आहेत आणि ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या बंदी असलेल्या जिहादी आतंकवादी संघटनेचा जन्म येथेच झाला आहे’, असे म्हटले असतांना कायदा कुठे आहे ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
या आंदोलनात हिंदु जागरण वेदिकेचे जिल्हाप्रमुख सुब्रह्मण्य कुमटा, माजी मंत्री शिवानंद नाईक, माजी आमदार सुनील नाईक, नामधारी समाजाचे अध्यक्ष अरुण नाईक, हिंदु संघटनांचे श्रीकांत नाईक, गोविंद नाईक, कृष्णा नाईक आसराकेरी, श्रीनिवास नाईक, दिनेश नाईक, राजेश नाईक, जयंत नाईक, शैलेंद्र जैन, ‘हुरळीसाल युनिट’चे सुब्राय नाईक यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. हिंदु जागरण वेदिकेचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण नाईक यांनी प्रास्ताविक केले.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !