काँग्रेस आणि साम्यवादी पक्ष यांच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
कोलकाता (बंगाल) – ७ जूनच्या मध्यरात्रीनंतर जाधवपूर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली. स्थानकाजवळील अनेक अनधिकृत दुकाने आणि बांधकामे पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. याला साम्यवादी पक्ष, तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी बुलडोझरसमोर झोपणे, यंत्रांवर चढणे आदी कृत्ये करून विरोध केला. प्रशासनाच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांना या वेळी कह्यात घेण्यात आले, तसेच ५ जणांना अटक करण्यात आली. यात माकपचे केंद्रीय समितीचे सदस्य सुजन चक्रवर्ती यांचाही समावेश आहे. या वेळी पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमारही केला. रेल्वे सुरक्षा दल, कोलकाता पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा यांच्या सैनिकांच्या कडेकोट बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली.
रेल्वे प्रशासनाची भूमिका !
जाधवपूर रेल्वे स्थानकच्या परिसरातील दुकाने, स्टॉल्स आणि इमारती पूर्णपणे अवैध होत्या. त्यांनी रेल्वेच्या मालमत्तेवर अतिक्रमण केले होते. ही कारवाई कायदे आणि नियम यांचे पालन करूनच पूर्ण करण्यात आली. याआधी रेल्वेने हावडा आणि सियालदह या स्थानकांच्या परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी अशीच मोहीम राबवली होती.

गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !