पोलिसांना आव्हान देणे आणि खंडणी या आरोपांखाली अटक

कोलकाता – बंगालमधील फाल्टा विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांना राज्य पोलिसांच्या विशेष कृती दलाने अटक केली. निवडणुकीशी संबंधित हिंसाचाराच्या प्रकरणात आरोपी असलेले जहांगीर बर्याच काळापासून फरार होते. यापूर्वी मतदानाच्या कालावधीत पोलिसांना उघडपणे आव्हान दिल्यामुळे ते चर्चेत आले होते. उत्तर बंगालमधील भारत-नेपाळ सीमेजवळ खंडणीच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
🚨 Trinamool Congress leader Jahangir Khan, absconding for a long time in election-related violence cases, has finally been arrested near the India–Nepal border.
The same Jahangir Khan had arrogantly challenged an election-duty police officer with the dialogue, “Pushpa Jhukega… pic.twitter.com/ejjD2rVh3y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 8, 2026
१. कलकत्ता उच्च न्यायालयाने जहांगीर खान यांना दिलेले अंतरिम संरक्षण २६ मे या दिवशी रहित केले होते. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फाल्टा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध ७ प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवण्यात आला होता.
२. एका पोलीस अधिकार्याने सांगितले की, जहांगीर खान यांना उत्तर बंगालमधील भारत-नेपाळ सीमेजवळून अटक करण्यात आली; मात्र पोलिसांनी या अटकेविषयी सविस्तर माहिती दिली नाही.
काय आहे प्रकरण ?
बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंसाचार आणि नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपांमुळे फाल्टामधील मतदान थांबवण्यात आले होते. निवडणुकीच्या वेळी जहांगीर खान यांनी निवडणूक आयोगाद्वारे नियुक्त केलेल्या पोलीस अधिकार्याला ‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘पुष्पा झुकेगा नहीं’ (पुष्पा झुकणार नाही) हा संवाद म्हणून आव्हान दिले होते. यामुळे तणाव निर्माण झाला होता.
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी