सँटो डॉमिंगो (डोमिनिकन रिपब्लिक) – येथील ‘ला रोमाना’ आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक खासगी जेट कोसळले. आणीबाणीच्या स्थितीत लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असतांना हे विमान धावपट्टीवर आदळून उसळले आणि काही क्षणांतच आगीच्या प्रचंड गोळ्यात रूपांतरित झाले. या अपघातात वैमानिक आणि सह-वैमानिक यांचा मृत्यू झाला. ‘डोमिनिकन सिव्हिल एव्हिएशन इन्स्टिट्यूट’च्या माहितीनुसार, गल्फस्ट्रीम जी-२००’ हे जेट विमान ‘ला रोमाना’ येथून अमेरिकेच्या ऑस्टिन शहराकडे जात होते. प्राथमिक माहितीनुसार तांत्रिक बिघाड हेच या अपघाताचे कारण असल्याचे समजते.

डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani