
पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरात भरलेल्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ (पाकिस्तानमध्ये उत्पादित केलेली वस्तू), असे ‘लेबल’ लावलेल्या वस्तूंची विक्री केली जात असल्याची घटना उघड झाली आहे. एका महिलेने याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे. यात्रेतील कक्षावर खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये एक चादर होती. तिच्यावर ‘मेड इन पाकिस्तान’ असे लेबल होते. ते पाहून त्या महिलेचा संताप अनावर झाला. या प्रकरणी अधिक चौकशी होईलच; पण या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याची गंभीरतेने नोंद घ्यायला हवी. पाकिस्तान हे भारताचे शत्रूराष्ट्र ! विविध आतंकवादी आक्रमणांमुळे, तसेच भारतीय सैनिकांना ठार केल्यामुळे भारतियांच्या मनात पाकविषयी रोष आहेच. त्यामुळे असे लेबल पाहून भारतियांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. हिंदू संघटित होऊन या घटनेचा सोक्षमोक्ष लावतीलच; पण सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांनी तत्परतेने पावले उचलून संबंधितांवर कारवाई केल्यास हिंदूंना त्यांचा वेळ धार्मिक गोष्टींसाठी देता येईल. जर ग्राहकांनी अशा वस्तू खरेदी करतांना ऑनलाईन माध्यमांतून व्यवहार केला असेल, तर त्याद्वारे शोध घेऊन या टोळीच्या मुळाशी जाणे अधिक सोपे होऊ शकते. संबंधित महिलेने व्हिडिओद्वारे याचे वास्तव समोर आणले आहे; पण ‘मेड इन पाकिस्तान’ असे लिहिलेल्या अन्य चादरी किंवा वस्तू आणखी कुणाकडे गेल्या असतील, तर त्याचाही शोध घ्यावा लागेल. ज्या ग्राहकांनी असे लेबल असलेल्या वस्तू घेतल्या असतील, त्यांनीही पुढे येऊन वास्तव समाजाला सांगायला हवे. हिंदूंनी मोठ्या प्रमाणात याविरोधात आवाज उठवायला हवा. काही जणांचे म्हणणे आहे की, हे लेबल खोटेही असू शकते; पण ‘जर लेबल खोटे आहे’, असे मानले, तर मग असा खोडसाळपणा करणार्यांवरही कारवाई का होऊ नये ? एखाद्या भारतियाने ‘मेड इन पाकिस्तान’चे लेबल लावणे, हा भारतियत्वाचा अवमानच आहे. अशा पाकप्रेमींची चौकशी करून त्यांना पाकिस्तानमध्ये हाकलून द्यायला हवे.

पुण्यातील व्यापार मुसलमानांच्या हाती !
बाजारपेठांमध्ये किंवा यात्रेत विकल्या जाणार्या अशा वस्तू नेमक्या येतात कुठून ? स्थानिक विक्रेते त्यांची पडताळणी करतात का ? शत्रूराष्ट्र असणार्या पाकिस्तानच्या वस्तूंवर भारतात निर्बंध असतांना या वस्तू येथे येतातच कशा ? असे प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत. या अनुषंगाने पिंपरी-चिंचवडमधील व्यापार्यांची चौकशी व्हायला हवी. या व्यापार्यांमध्ये अधिक प्रमाणात मुसलमानांचा समावेश आहे. हे व्यापारी स्थानिक नसून मुंबई, कळवा, तसेच मुंब्रा या भागांतील असल्याचे उघड झाले आहे आणि हिंदु व्यापार्यांची संख्या मात्र हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकीच आहे. मुसलमान व्यापारी त्यांचे बस्तान मांडतात आणि जागा अडवतात. काही हिंदुत्वनिष्ठांनी त्या व्यापार्यांकडे ओळखपत्राची मागणी केली असता त्यांनी ते दाखवण्यास टाळाटाळ केली. त्यातील काही जणांकडे खोटी ओळखपत्रे होती, तर काही जण ओळखपत्रांअभावी कारवाईच्या भीतीने तेथून पळून गेले. याविरोधात आजवर अनेकदा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निवेदने देऊन विरोध केला, तसेच कारवाईची मागणीही केली; पण पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलीस आयुक्तालय, महापौर-उपमहापौर, आजी-माजी नगरसेवक यांनी याविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. दायित्व एकमेकांवर ढकलून निष्क्रीय रहाण्याचे धोरण त्या सर्वांनी अवलंबले. अशाने होते काय, तर धर्मांधांचे फावते आणि अन्याय मात्र सहन करावा लागतो, तो हिंदूंना ! या मुसलमान व्यापार्यांवर नियंत्रण ठेवणार कोण ? हा प्रश्नच आहे. पुण्यातील मोठमोठ्या मॉल्समध्ये ‘मेड इन बांगलादेश’, ‘मेड इन ढाका’ असे लेबल लिहिलेल्या वस्तू विक्रीला ठेवलेल्या असतात. पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशाच्या वस्तूंवरही निर्बंध आहेत का ? हे पडताळायला हवे. जर निर्बंध असतील, तर मग या वस्तू मॉलमध्ये येतातच कशा ? याचीही चौकशी व्हायला हवी. पुण्याप्रमाणे अन्य जिल्ह्यांत किंवा राज्यांत असे घडते का ? याकडेही हिंदूंनी लक्ष देऊन प्रशासन किंवा सरकार यांच्याकडे याविषयी मोठ्या संख्येने तक्रारी प्रविष्ट करायला हव्यात. आता कोणतीही वस्तू किंवा उत्पादन खरेदी करतांना त्यांचा मूळ देश पडताळून घेणे क्रमप्राप्त आहे. आधी चीनने विविध वस्तूंच्या माध्यमातून भारतात हात-पाय पसरले आहेतच, त्यात आता पाकिस्तानची भर पडली ! ‘दुधाने तोंड पोळल्याने ताकही फुंकून प्यावे’, असे म्हणतात; पण अशा घटना पहाता आता पाणीही फुंकून पिण्याची वेळ हिंदूंवर आली आहे. आज हिंदू पैसे, नोकरी, चंगळवाद यांच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे धर्म किंवा राष्ट्र यांच्याशी त्यांना कसलेच देणे-घेणे नाही; पण याउलट मुसलमान ‘धर्म आणि राष्ट्र प्रथम’ मानतात अन् त्यातूनच इस्लामीत्व इतरांवर लादतात. पुण्यातील सारसबागेतील मंदिर परिसरात करण्यात आलेले नमाजपठण असो किंवा स्थानिक हिंदूबहुल परिसरात मुसलमान महिला-पुरुष यांचा वाढता वावर असो, ही पुणे जिल्ह्यासाठी धोक्याची घंटाच आहे. उद्या हेच धर्मांध आक्रमक झाले, तर पुण्यातील हिंदूंवर पलायनाची वेळ ओढावू शकते. हिंदूंनी याची भयावहता लक्षात घेऊन धर्मरक्षणासाठी वेळीच संघटित व्हायला हवे.
राष्ट्रहित जाणा !
भारतियांना ‘मेड इन चायना (चीन)’च्या वस्तूंची पुष्कळ सवय झाली आहे. आता तर ‘हलाल’ प्रमाणित वस्तू किंवा खाद्यपदार्थही भारतियांच्या घरात सर्रास आढळतात. मॉलमध्ये मिळणार्या पाश्चात्त्यांच्या वस्तू किंवा सौंदर्यप्रसाधने आदी उत्पादनेही भारतीय मोठ्या प्रमाणात वापरतात. ‘पाश्चात्त्यांच्या वस्तू, म्हणजे डोळे मिटून त्यांच्या सत्यतेवर विश्वास ठेवण्यासारखे आहे’, असे भारतियांना वाटत असते. थोडक्यात काय, तर आज भारतियांचे भारतीयत्व हे केवळ नावापुरते राहिलेले आहे. ‘स्वदेशी’ वस्तू भारतियांच्या घरात सापडणे दुर्मिळ होत चालले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या वस्तू जरी घरात आल्या, तरी काही भारतियांना फरकच पडणार नाही; कारण त्यांच्यात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राभिमान यांचा अभाव आहे. ‘स्वत्व’ गमावून बसलेल्या अशा भारतियांनी वेळीच जागे होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आज केवळ परकियांच्या वस्तू वापरणारे भारतीय कधी ‘पाकिस्तानी’, ‘बांगलादेशी’ किंवा ‘चिनी’ होतील, हे त्यांचेही त्यांना कळणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात हयगय करून चालणार नाही. शत्रूराष्ट्राच्या संदर्भातील कोणत्याही सूत्राकडे दुर्लक्ष करणेही परवडणार नाही. त्यामुळे राज्य आणि केंद्र येथे सत्ता असणार्या ‘हिंदुत्वनिष्ठ’ भाजपने राष्ट्रहितार्थ कृती करून हिंदूंना दिलासा द्यावा. हिंदूबहुल ठिकाणचा व्यापार, म्हणजे अर्थकारण हिंदूंच्याच हाती राहील, या दृष्टीने ठोस पावले उचलावीत, हाच यावरील एकमेव मार्ग आहे.
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !
मंदिरातील पुरोहित आणि पौरोहित्य !