फैजानला अटक
रुग्णालयही अवैध असल्याचे निष्पन्न
बिजनौर (उत्तरप्रदेश) – येथील धामपूर भागात बलात्कार आणि बलपूर्वक धर्मांतर करण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेहौरमधील हबीबवाला येथील ‘शिफा नर्सिंग होम’मध्ये काम करणार्या २८ वर्षीय हिंदु दलित महिलेने या रुग्णालयाचा चालक डॉ. फैजान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, लग्नाचे आमीष दाखवून फैजानने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. ती गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. तसेच त्याने तिला मांस खाऊ घातले आणि धर्मांतरासाठी दबाव टाकला.
१. पीडित हिंदु महिलेने २ जून या दिवशी स्थानिक पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून कारागृहात पाठवले.
२. आरोपी फैजान आधीच विवाहित होता; परंतु त्याने ही महत्त्वाची गोष्ट पीडित महिलेपासून लपवून ठेवली होती.
३. ६ जूनला महसूल आणि आरोग्य विभागाच्या पथकाने फैजानच्या अवैध रुग्णालयाला टाळे ठोकले. या प्रकरणातील इतर संशयित शबान, फरमान आणि आरिफ यांनाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
४. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कौशलेंद्र सिंह यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता नव्हती आणि रुग्णालय चालवण्यासाठी आवश्यक वैध कागदपत्रेही त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे नियमांनुसार कारवाई करण्यात आली असून पुढील अन्वेषण चालू आहे.
५. स्थानिक हिंदु संघटना आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार ओम कुमार यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला. हिंदु कार्यकर्त्यांनी आरोप केला की, या गुन्ह्यात फैजानचा भाऊही सामील होता. या प्रकरणात सामूहिक बलात्काराचे (गँग रेप) कलम समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.

‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
उरुळी कांचन (पुणे) येथे मुसलमान दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग !
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !