सध्या पेठेत खरेदीसाठी गेल्यावर लक्षात येते की, कानात घालण्यासाठीच्या कर्णभूषणांचे विविध प्रकार असतात. त्यातील काही प्रकार तर इतके मोठे असतात की, ते घातल्यामुळे कानाची पाळीही खाली लोंबू लागते. काही कानातले डूल त्यांच्या चित्रविचित्र नक्षीमुळे पहावेसेही वाटत नाही. समाजाला योग्य-अयोग्य किंवा सात्त्विक-असात्त्विक हे पहाण्याची दृष्टीच नसल्याने त्यांना हा भेद लक्षातच येत नाही. त्यामुळे त्यांचा कल शक्यतो असात्त्विक किंवा आसुरी अशा प्रकारचे कानातले घेण्याकडेच अधिक रहातो.
वरील सूक्ष्म-चित्रात असात्त्विक आणि सात्त्विक कर्णभूषण घातल्याने काय परिणाम होतो, हे दिले आहे. सर्वांनी ते वाचून कोणत्या प्रकारचे कर्णभूषण खरेदी करावेत, ते ठरवावे !
असात्त्विक आणि सात्त्विक अलंकार, तसेच आभूषणे ओळखण्याची दृष्टी स्वतःत निर्माण करा !
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात. |