२८ मार्च २०२१ (फाल्गुन पौर्णिमा) या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने…
‘फाल्गुन पौर्णिमा (२८.३.२०२१) या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये (सद्गुरु स्वातीताई) यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांना सद्गुरु स्वातीताईंमधील शिवभक्तीविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
‘मागील वर्षी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे काही मास सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) प्रतिदिन शिवाची पूजा करायच्या. त्यासाठी त्यांच्याकडे एक शिवपिंडी होती. शिवाची पूजा त्या पुष्कळ भावपूर्ण आणि अतिशय तल्लीन होऊन करायच्या. पूजेची सिद्धता करतांनाही त्यांचे अखंड शिवस्मरण चालू असायचे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मला त्यांच्या शिवभक्तीविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि काही दैवी क्षण त्यांच्या चरणी अर्पण करत आहे.
१. सद्गुरु स्वातीताईंना शिवपूजेसाठी आवश्यक असलेली पांढरी, सुगंधी आणि टवटवीत फुले मिळणे
सद्गुरु स्वातीताईंच्या शिवपूजेसाठी आवश्यक असलेली ‘पांढरी फुले उपलब्ध होतील का ?’, असे मला कधी कधी वाटायचे; पण भगवान शिव आणि गुरुदेव यांच्या कृपेमुळे फुले आणणार्या साधकांना आपोआप सुगंधी आणि पांढरी टवटवीत फुले पूजेच्या आधी उपलब्ध व्हायची. या फुलांची सेवा करणार्या साधकांचीही ही सेवा करतांना पुष्कळ भावजागृती व्हायची.
२. सद्गुरु स्वातीताईंनी केलेल्या भावपूर्ण शिवपूजेकडे पहातांना आलेल्या अनुभूती
अ. पुणे येथील सेवाकेंद्रात सद्गुरु स्वातीताई शिवपूजा करायच्या. त्या वेळी सेवाकेंद्रातील वातावरण शिवमय होऊन जायचे.
आ. सद्गुरु स्वातीताईंनी वाहिलेल्या पांढर्याशुभ्र फुलांनी सुशोभित झालेली शिवपूजा पहातांना ‘ती बघतच रहावे’, असे मला वाटायचे.
इ. सद्गुरु स्वातीताईंनी पूजा केलेल्या शिवाच्या पिंडीकडे बघून माझे ध्यान लागल्यासारखे व्हायचे.
ई. शिवपिंडीवर वाहिलेली पांढर्याशुभ्र फुलांची आरास बघतांना ‘शिवपिंडीतून शिवतत्त्वाची स्पंदने आणि पांढरे किरण बाहेर पडत आहेत’, असे मला जाणवायचे.
उ. सद्गुरु स्वातीताईंनी शिवाच्या पूजेसाठी प्रज्वलित केलेला तुपाचा दिवा पुष्कळ वेळ तेवत रहायचा आणि त्या दिव्याची ज्योतही स्थिर अन् शांतपणे तेवायची.
ऊ. सद्गुरु स्वातीताईंनी शिवपूजेसाठी लावलेल्या सुगंधी उदबत्तीच्या धुरामध्ये मला पुष्कळ वेळा ‘ॐ’ दिसायचे.
३. सद्गुरु स्वातीताई घेत असलेल्या भावार्चनेतील शिवतत्त्व अनुभवता येणे
व्यष्टी साधनेचा आढावा किंवा अन्य सत्संगांच्या आधी सद्गुरु स्वातीताई भगवान शिवाची भावार्चना घेतात. त्या वेळी प्रत्येक साधकाला शिवतत्त्व अनुभवता येते. ‘आम्ही सर्व साधक कापराच्या डोंगरात बसून नामजप करत आहोत किंवा कैलास पर्वतावर भगवान शिवाच्या सान्निध्यात नामजप करत आहोत आणि शिवाच्या डमरूचा आवाज सर्वत्र घुमत आहे’, अशा विविध भावार्चनांतील भावाच्या वेळी प्रत्येक वेळेला आम्ही सर्वजण ते शिवतत्त्व अनुभवू शकत होतो.
४. सद्गुरु स्वातीताई घेत असलेल्या शिव भावार्चनेच्या वेळी अनुभवलेले दैवी क्षण !
अ. एकदा सद्गुरु स्वातीताई शिवाची भावार्चना घेत असतांना खिडकीत एक फुलपाखरू आले आणि भावार्चना पूर्ण होईपर्यंत ते तिथेच स्तब्ध बसले होते. त्या वेळी ‘ते भावार्चना ऐकत आहे’, असे मला वाटले.
आ. भावार्चनेच्या वेळी कधी कापराचा दैवी सुगंध येतो, तर कधी थंड झुळूक येते.
इ. सद्गुरु स्वातीताई भगवान शिवाची भावार्चना घेतात किंवा शिवाची पूजा करतात, त्या वेळी ‘त्या शिवस्तुती गात आहेत’, असे मला जाणवते.
५. सद्गुरु स्वातीताई शिवमंदिरात नामजप करत असतांना ‘ते संपूर्ण दृश्य शिवलोकातील आहे’, असे जाणवणे
मागील वर्षी आम्ही सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत पुणे जिल्ह्यातील पाताळेश्वर या प्राचीन शिवालयामध्ये गेलो होतो. त्या वेळी सद्गुरु स्वातीताई तिथे शिवाचा नामजप करत असतांना काही क्षण मला ‘गाभार्यातील वातावरण, शिवपिंडी आणि शिवस्मरण करणार्या सद्गुरु स्वातीताई हे सर्व दृश्य शिवलोकातील आहे’, असे जाणवले.
६. सद्गुरु स्वातीताईंनी शिवरात्रीच्या दिवशी घेतलेल्या नामसत्संगात शिवमंदिराचे चैतन्य आणि थंडावा जाणवणे
या वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी (११.३.२०२१ या दिवशी) पहाटे सद्गुरु स्वातीताईंनी पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील साधकांसाठी (ऑनलाईन) नामजप सत्संग घेतला होता. त्या नामजप सत्संगाला दोन सहस्र साधक जोडलेे होते. त्या वेळी संपूर्ण वातावरणात वेगळेच चैतन्य, थंडावा आणि ‘शिवाच्या गाभार्यात जाणवतात’, तशी स्पंदने जाणवत होती.
सद्गुरु स्वातीताईंची शिवभक्ती अद्भुत आहे. ‘अतूट शिवभक्ती’ हे त्यांचे दैवी गुणवैशिष्ट्य मला त्यांच्या सहवासात अनुभवता आले. त्यासाठी मी श्री गुरु, भगवान शिव (महादेव) आणि सद्गुरु स्वातीताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. मनीषा महेश पाठक, पुणे
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |