२ दिवसांत वसूल केले १० लाख ७५ सहस्र रुपये
कराड, २५ मार्च (वार्ता.) – कराड नगरपालिकेच्या मालकीच्या दुकान गाळ्यांच्या थकीत करवसुलीसाठी कठोर पावले उचलत ‘नोटीस’ देऊन दुकान गाळे ‘सील’ करण्यास प्रारंभ केला आहे. वसुली मोहीम गतीमान करत केवळ २ दिवसांत कराड नगरपालिकेने १० लाख ७५ सहस्र रुपयांची वसुली केली आहे.
पालिकेने दिलेल्या ‘नोटीसी’ला अनुसरून दुकानगाळे ‘सील’ करण्यात आले आहेत. वर्षभर पालिकेच्या गाळ्यांमध्ये व्यावसायिक व्यवसाय करत असतात. आर्थिक वर्षाखेरीस, तरी त्यांनी कर भरणे अपेक्षित आहे; मात्र गाळेधारक याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा व्यावसायिकांचेच गाळे पालिकेकडून ‘सील’ केले जात आहेत. कारवाईचा कटू प्रसंग टाळण्यासाठी पालिकेच्या करविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.