इस्लामी आतंकवादाविषयी लिखाण प्रकाशित केल्यावरून प्रकाशन संस्थेच्या कार्यालयाची धर्मांधांकडून तोडफोड !

  • राजस्थानमधील घटना 

  • धर्मांधांनी पुस्तकेही जाळली !

  • धर्मांध त्यांच्या धर्माच्या विरोधात काहीही झाले, तर थेट कायदा हातात घेतात, तर हिंदू साधा निषेधही व्यक्त करत नाहीत !
  • काँग्रेसच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! येथे धर्मांधांचा उद्दामपणा वाढल्यास नवल ते काय ?

जयपूर – येथे एका पुस्तकामध्ये इस्लामी आतंकवादाविषयी लिखाण असणारे पुस्तक प्रकाशित केल्यामुळे संतप्त झालेल्या धर्मांधांनी पुस्तकाचे प्रकाशन करणार्‍या संजीव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयावर आक्रमण करून तोडफोड केली. तसेच येथे ठेवण्यात आलेल्या पुस्तकांची जाळपोळ केली. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांना अटक केली आहे. या प्रकाशन संस्थेकडून इयत्ता १२ वीचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. त्यात इस्लामी आतंकवादाविषयी लिखाण आहे. हे पुस्तक वर्ष २०१७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. ४ वर्षांनंतर त्याचा विरोध करण्यात आला.

१. संजीव प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापक विजय शंकर शुक्ला यांनी सांगितले की, राज्यशास्त्राच्या पुस्तकामुळे हे आक्रमण करण्यात आले आहे. यात इस्लामी आतंकवादाविषयी एक प्रश्‍न विचारण्यात आला आहे आणि त्याला उत्तर देण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेमध्येही हा प्रश्‍न विचारण्यात आला होता. विशेष म्हणजे हे लिखाण आणि पुस्तक मागे घेण्यात आले असतांनाही हे आक्रमण झाले आहे. (असे असतांनाही धर्मांध आक्रमण करतात, यावरून त्यांची धर्मांधता दिसून येते ! – संपादक)

२. काँग्रेसचे आमदार रफीक खान यांनी या लिखाणाविषयी विधानसभेमध्ये प्रश्‍न उपस्थित केला होता आणि पोलीस चौकशी करून कारवाईची मागणी केली होती.

(सौजन्य : First India News Rajasthan)

पुस्तकातील प्रश्‍न आणि उत्तर

प्रश्‍न : इस्लामी आतंकवादामुळे तुम्हाला काय समजले आहे ?

उत्तर : ‘इस्लामी आतंकवाद’ इस्लामचेच एक रूप आहे. ते गेली २० ते ३० वर्षे सर्वाधिक शक्तीशाली बनले आहे. आतंकवादी एका संघटनेसाठी काम करत नसून एका धर्मासाठी कारवाया करत आहेत. हेच इस्लामी आतंकवादाचे मुख्य लक्षण आहे. धर्म अथवा अल्ला यांच्या नावावर आत्मघाती आक्रमण करणे, अत्यंत क्रौर्य दाखवणे, खंडणी वसूल करणे आणि अमानुष हत्या, अशी या आतंकवादाची ओळख झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद पूर्णपणे धार्मिक आणि फुटीरतावादी आहे.