डासना (उत्तरप्रदेश) येथील देवीच्या मंदिरात गेलेल्या मुसलमानाला चोपले !

चोरी करण्याच्या उद्देशाने तरुणाने केला होता मंदिरात प्रवेश ! – महंत यति नरसिंहानंद सरस्वती

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील डासना क्षेत्रातील देवीच्या मंदिरात काही दिवसांपूर्वी आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाला चोपण्यात आले होते. ‘तो येथे पाणी पिण्यासाठी आला होता आणि त्याला चोपण्यात आले’, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. (हिंदूंना असहिष्णु दाखवण्याचा ढोंगी निधर्मीवादी प्रसारमाध्यमे नेहमीच प्रयत्न करत असतात, त्यातीलच हे एक उदाहरण ! – संपादक) प्रत्यक्षात या मंदिराबाहेर फलक लावण्यात आला असून त्यात ‘हिंदूंच्या व्यतिरिक्त अन्य कुणालाही मंदिरात प्रवेश नाही’, असे लिहिण्यात आले आहे. आसिफ याने सांगितले की, त्याला फलकाविषयी काही ठाऊक नव्हते. (चोर कधीतरी म्हणेल का की, त्याने चोरी केली आहे ! – संपादक) याविषयी मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी सांगितले की, आसिफ मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. त्यामुळे त्याला चोपण्यात आले.

महंत यति नरसिंहनंद सरस्वती यांनी फलकाविषयी सांगितले की, मागील सरकारच्या काळापासून येथे हा फलक असून तो कदापी हटवण्यात येणार नाही. जर जिल्हा प्रशासन आणि पोलीस फलक काढण्याचा प्रयत्न करतील, तर मीसुद्धा त्याला विरोध करीन. (हिंदूंच्या मंदिरामध्ये कुणी प्रवेश करावा आणि करू नये, हा त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तो कुणालाही हिरावून घेता येणार नाही ! – संपादक)