मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी श्‍वेतपत्रिका काढावी !

चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत मागणी

मुंबई, ४ मार्च – राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी उल्लेख केला नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात, तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाची काय स्थिती आहे, या प्रकरणी राज्य सरकारने अधिवेशनाच्या काळात ८ मार्चपूर्वीच श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली.

सहकार क्षेत्राचा एकाही ओळीचा उल्लेख राज्यपालांनी अभिभाषणात केला नसल्याचे निर्दशनास आणून देत चंद्रकांत पाटील म्हणाले की, बिहार, बंगाल, केरळ येथे निवडणुका होत आहेत; मात्र सहकारी क्षेत्रातील निवडणुका का होत नाहीत ?