ध्यानात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांना पाहिल्यावर ‘त्या तिघी जणी महालक्ष्मीदेवीचे प्रतीक आहेत’, असे जाणवणे

ध्यानमंदिरात ध्यानाला बसल्यावर ३ देवी उभ्या असल्याचे दिसणे आणि त्यानंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांना पाहिल्यावर ‘त्या तिघी जणी महालक्ष्मीदेवीचे प्रतीक आहेत’, असे जाणवणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव

‘मी ध्यानमंदिरात ध्यानाला बसले होते. तेव्हा मला ‘३ देवी उभ्या आहेत’, असे दिसले. त्या वेळी देवी म्हणाली, ‘तुम्ही सर्व पूर्णवेळ साधक आहात आणि धर्मप्रसाराचे कार्य करता; म्हणून तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मी आले आहे.’

त्याच रात्री श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव या तिघी जणी एकाच सुखासनावर (सोफ्यावर) बसल्या होत्या. तेव्हा ‘त्या तिघी जणी श्री महालक्ष्मीदेवीचे प्रतीक आहेत’, असे वाटले आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.’ – सौ. चारुलता नखाते, मुंबई. (३०.३.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक