सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
एकदा सत्संगात कु. सुवर्णा श्रीराम यांनी विचारलेल्या प्रश्नाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेले उत्तर खाली दिले आहे.

१. कर्तेपणाचा विचार जाऊन सेवाभाव निर्माण होणे आवश्यक !

कु. सुवर्णा श्रीराम : मागील सत्संगात तुम्ही मला सुचवले होते, ‘‘व्यष्टी साधनेचा आढावा आणि भावसत्संग यांमध्ये शिकण्यासाठी बसायचे असते.’’ तेव्हापासून मी सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांच्या समवेत आढावा घेतांना आणि भावसत्संगात सूत्रे सांगतांना शिकण्याचा प्रयत्न करत आहे. आरंभी माझ्या मनात ‘मी आढाव्यामध्ये बोलत आहे’, असा कर्तेपणाचा विचार असायचा; पण नंतर आढाव्यातूनच मला पुष्कळ शिकायला मिळाले आणि आता असे वाटते, ‘तुम्ही मला साधकांची सेवा करत आहे’, या भावाने सत्संग घेण्यास शिकवत आहात.
२. साधना करतांना जे गुण अल्प असतात, ते देव देतो !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : पाहिलेत ना ! यांच्या मनात ‘मी सत्संग घेते’, असा विचार नाही. ‘मला दुसर्यांची सेवा करायची आहे’, असा विचार आहे. साधना करत असतांना आपल्यामध्ये जे गुण अल्प असतात, ते गुण त्या त्या वेळी देव देतो.
– कु. सुवर्णा श्रीराम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१.२०२४)