सांगली महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ! 

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतांना महापौर सौ. गीता सुतार (डावीकडे), तसेच अन्य

सांगली, १९ फेब्रुवारी – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्यास महापौर सौ. गीता सुतार आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी उपायुक्त राहुल रोकडे, साहाय्यक आयुक्त एस्.एस्. खरात, प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे यांसह महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.