‘पूर्वी मला चुकांच्या सत्संगामध्ये माझ्या चुका सांगितल्यावर पुष्कळ ताण यायचा. चूक सांगितल्यावर मी अनेक दिवस अलिप्त रहाणे, स्वत:च्या कोषात रहाणे, अधिक न बोलणे, समष्टीत सहभाग न घेणे, असे वागायचो. काही काळ यावर प्रक्रिया केल्यापासून आता चुकांच्या सत्संगांचा ताण न्यून झाला असून सत्संग झाला, तरी पुन्हा अल्प वेळेत पूर्ववत् होऊन सर्वत्र सहभाग घेणे जमू लागले आहे. या संदर्भात संतांना सांगितले असता त्यांनी सांगितले, ‘चूक सांगितली की ताण येतो; पण पुन्हा काही वेळाने पूर्ववत् होऊन समष्टीत सहभाग घेणे, मिळून मिसळून रहाणे, सर्वांकडून शिकणे, हे महत्त्वाचे आहे.’
– श्री. विश्वनाथ कुलकर्णी, वाराणसी, उत्तरप्रदेश. (३१.१.२०२१)