
कोल्हापूर – ‘प.पू. नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ कोल्हापूर’ यांच्या वतीने हिंदु नववर्षानिमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. अत्यंत शिस्तबद्ध आणि विविध प्रबोधनपर फलकांनी, तसेच विविध देखावे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील भक्तगण यामध्ये सहभागी झाले होते. प्रायव्हेट हायस्कूल येथून चालू झालेली ही शोभायात्रा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी येथून परत प्रायव्हेट हायस्कूल येथे समाप्त झाली.
या शोभायात्रेत ढोलपथक, श्रीराम पंचायतन, नऊ फुटी बजरंगबली, मावळ्यांची वेशभूषा, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, झाशीची राणी यांसह अन्य अनेक वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या. यात प.पू. नरेंद्राचार्यजी महाराज यांची पालखी विशेष सजवण्यात आली होती. या मिरवणुकीत कृष्णात माळी, एम्.आर्. पाटील, मधुकर बाबर, दिलीप कोळी, विजय धनावडे, अमोल पाटील, अमित लाड, विजय पाटील, प्रणाली पाटील, माधुरी मोळे, मनीषा मगदूम यांसह भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.