पाकिस्तानात ‘स्वतंत्र सिंधु देशा’साठी मोर्चा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील प्रमुख नेत्यांचे फलक

  •  सध्या पाकमधील राजकीय स्थिती पहाता भविष्यात पाकचे ५ – ६ तुकडे झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • भारताने अशी मागणी करणार्‍यांना सर्व प्रकारचे साहाय्य करून पाकचे तुकडे होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
पाकिस्तानात ‘स्वतंत्र सिंधु देशा’साठी निघालेला मोर्चा

सान (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील सान शहरात १७ जानेवारी या दिवशी ‘स्वतंत्र सिंधु देशा’’च्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील प्रमुख नेत्यांची छायाचित्रे झळकवण्यात आली होती.

‘या आंतरराष्ट्रीय समुदयाने आमच्या स्वातंत्र्य लढ्यात हस्तक्षेप करावा’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मोर्च्यात सहभागी झालेले ‘स्वतंत्र सिंधु देशा’च्या घोषणा देत होते.

पाकमध्ये पूर्वीपासून स्वतंत्र बलुचिस्तानसाठीही मागणी करण्यात येत आहे, तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तानमधील लोकांनाही स्वातंत्र्य हवे आहे; मात्र अशी मागणी करणार्‍यांच्या विरोधात पाकिस्तानी सरकारकडून दडपशाही केली जात असून तेथील नागरिकांचे मानवी हक्क पायदळी तुडवले जात आहेत.