सातारा जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायती बिनविरोध

सातारा, ८ जानेवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतीमध्ये २ सहस्र ८१३ प्रभागांतून ७ सहस्र २६६ उमेदवार निवडून देण्यासाठी १७ सहस्र ६५६ जणांनी अर्ज प्रविष्ट केले होते. छाननीच्या दिवशी जिल्ह्यातील २५२ जणांचे अर्ज बाद झाल्यामुळे ४ जानेवारी या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून १२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अनुमाने ९८ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत २ सहस्र ६३१ उमेदवार बिनविरोध झाले असून आता ६५४ ग्रामपंचायतीमध्ये ९ सहस्र ५२१ जण निवडणूक रिंगणात आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान होणार आहे.